'तुतारी एक्स्प्रेस'च्या डब्यात वाढ, आणखी चार डबे जोडणार

दादर - सावंतवाडी 'तुतारी एक्स्प्रेस'ला कायमस्वरूपी आणखी चार डब्यांची जोडणी.

Updated: Nov 8, 2019, 12:52 PM IST
'तुतारी एक्स्प्रेस'च्या डब्यात वाढ, आणखी चार डबे जोडणार title=
संग्रहित छाया

मुंबई : गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन, यावर उतारा शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची पसंती असलेल्या दादर - सावंतवाडी 'तुतारी एक्स्प्रेस'ला कायमस्वरूपी आणखी चार डब्यांची जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे डब्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

११००३ / ११००४ तुतारी एक्स्प्रेसला आता अतिरिक्त एक वातानुकूलित थ्री टीयर, एक शयनयान श्रेणी आणि दोन जनरल (सामान्य) द्वितीय श्रेणी डबे जोडण्यात येणार आहेत. हे डबे सोमवारी ११ नोव्हेंबर २०१९ पासून कायमस्वरुपी जोडले जाणार आहेत. दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही नेहमी दादर टर्मिनसहून फलाट क्रमांक ७ वरून सुटते.  

दरम्यान, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आणि भुसावळ -पुणे एक्स्प्रेसला नवीन एलएचबी कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

तसेच पुणे - सोलापूर - पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आणि भुसावळ - पुणे - भुसावळ एक्स्प्रेसला नवीन एलएचबी कोच बसविण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबरपासून एलएचबी कोच असणारी १९ डब्यांची गाडी मार्गावर धावणार आहे.