पार्थ पवार यांनी पुन्हा भाषण करणं टाळलं

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांनी जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.

Updated: Mar 31, 2019, 09:06 PM IST
पार्थ पवार यांनी पुन्हा भाषण करणं टाळलं title=

पिंपरी चिंचवड : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांनी जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी कामगार मेळावा झाला, त्यावेळी अजित पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

अजित पवारांचं भाषण संपल्यानंतर पार्थ पवार यांचं कामगार मेळाव्याला आगमन झालं. यावेळीही त्यांनी भाषण करण्याचं टाळले. याबद्दल त्यांना विचारले असता, दादांचे विचार हे माझे विचार म्हणून बोललो नाही, असा युक्तिवाद पार्थ यांनी केला. यावेळी पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू जय पवार आणि जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे ही आले होते.

पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ १७ मार्चला मोठ्या धुमधडाक्यात झाला. पण पार्थ पवार यांच्या प्रचारापेक्षा इंग्रजाळलेल्या मराठीत त्यांनी केलेल्या भाषणाचीच चर्चा अधिक झाली आणि ते ट्रोलही झाले.