कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेस गाड्या २० ऑगस्टपर्यंत 'या' मार्गावरुन धावणार

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी पेडणे येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  

Updated: Aug 7, 2020, 10:24 AM IST
कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेस गाड्या २० ऑगस्टपर्यंत 'या' मार्गावरुन धावणार  title=
छाया सौजन्य - यश राणे

 मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी पेडणे येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पनवेल-पुणे-मिरज-लोंडा-मडगाव आणि मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-पनवेल मार्गे गाड्या वळविण्यात आल्या आहेत. या वळविण्यात आलेल्या गाड्या २० ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावणार आहेत, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.  

दरड कोसळली : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील पेडणे येथील बोगद्यात दरड रेल्वे रुळावर आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वेवर काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबई, दिल्ली,  एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम  येथून काही एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येत आहे. मात्र, या गाड्या पनवेल, पुणे, मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा वेळ लागणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर आलेली दरड मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गावरील वाहतूक २० ऑगस्टपर्यंत सुरळत होणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे २० ऑगस्टपर्यंत या गाड्या दुसऱ्या मार्गाने धावणार आहेत.

 वळविण्यात आलेल्या गाड्या 

 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस मडगाव - लोंडा - मिरज - पुणे - पनवेल - कल्याण मार्गे वळविण्यात आली आहे. ही गाडी २० ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल.

 हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस पनवेल - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव  मार्गे वळविण्यात आली आहे.  ही गाडी २० ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल.

 तिरुवनंतपुरम मध्य - लोकमान्य टिळक (टी) विशेष एक्सप्रेस मडगाव - लोंडा - मिरज - पुणे - पनवेल मार्गे वळविण्यात आली आहे.  ही गाडी २० ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल.

 लोकमान्य टिळक (टी) - तिरुअनंतपुरम मध्य पनवेल - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव या मार्गे आजपासून वळविण्यात आली आहे. ही गाडी २० ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल.

 नवी दिल्ली - तिरुअनंतपुरम मध्य राजधानी स्पेशल एक्सप्रेस पनवेल - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव मार्गे वळविण्यात आली आहे.  ही गाडी ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल.

 तिरुवनंतपुरम मध्य - नवी दिल्ली राजधानी स्पेशल एक्स्प्रेस मडगाव - लोंडा - मिरज - पुणे - पनवेल मार्गे वळविण्यात आली आहे.ही गाडी २० ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल.

हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम दुरंतो स्पेशल एक्स्प्रेस पनवेल - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव मार्गे वळविण्यात आली आहे.  ही गाडी ८ ते १५ ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल.

 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन दुरंतो स्पेशल एक्स्प्रे्स मडगाव - लोंडा - मिरज - पुणे - पनवेल मार्गे वळविण्यात आली आहे.  ही गाडी ११  ते १५ ऑगस्ट २०२० पर्यंत याच मार्गे धावेल. या गाड्याच्या दोन फेऱ्या होणार आहेत.