Video: हात दाखवून रस्ता ओलांडायची तुम्हालाही सवय आहे का? पुण्यातील महिलेसोबत काय झालं पाहाच

Pune Accident : पुण्यात झालेल्या या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यानी नोंद करुन तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 28, 2023, 09:26 AM IST
Video: हात दाखवून रस्ता ओलांडायची तुम्हालाही सवय आहे का? पुण्यातील महिलेसोबत काय झालं पाहाच title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : देशात दररोज भीषण अपघाताच्या (Accident News) शेकडो घटना समोर येत असतात. असाच एक अपघात पुण्यात (Pune News) घडलाय. डंपरखाली (Dumper) आल्याने एक महिलेचा भीषण अपघात झाला आहे. पुणे शहरात सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) झालेल्या अपघातात या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) समोर आले आहे. सुदैवाने या अपघात महिलेला आणखी कोणतीही जखम झालेली नाही. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर एक सिग्नल आहे. हा सिग्नल ओलांडताना डंपरने एका महिलेला चिरडलं आहे. सिग्नल सुटण्याच्या वेळेसच ही महिला झेब्रा क्रॉसिंगवरून जात होती. त्याचवेळी महिला डंपर खाली आली. रस्ता ओलांडणारी महिला डंपर चालकाला दिसली नाही. त्यानंतर डंपर महिलेच्या पायावरुन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये समोर आले. डंपर पुढे निघून गेल्यानंतर जखमी महिला जागेवर उठून बसली. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी जखमी महिलेला रस्त्याच्या बाजूला आणलं.

जखमी महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. डंपर गेल्याने महिला विव्हळत रस्त्यावर पडली होती. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी महिलेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पिंपरीत टॅंकरचा अपघात

मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकरचा पिंपरीतील निगडीत अपघात झालाय. निगडीमध्ये भुयारी मार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी टॅंकरचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास कठड्याला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. महामार्गावरील भुयारी मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने सातत्याने याठिकाणी अपघात होत आहेत. या अपघातानंतर टॅंकर चालक पसार झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.