डीएसकेंचा आज फैसला...अटक की जामीन?

डीएसके प्रकरणी २२ फेब्रुवारीला निकाल देणार असल्याचं मंगळवारी उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 16, 2018, 09:27 AM IST
डीएसकेंचा आज फैसला...अटक की जामीन? title=

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. डीएसके प्रकरणी २२ फेब्रुवारीला निकाल देणार असल्याचं मंगळवारी उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. 

नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर विशेष सुनावणी

मात्र काल काही नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर विशेष सुनावणी घेण्यात आली. त्यात डीएसके प्रकरणाचा निकाल २२ फेब्रुवारी ऐवजी आज ठेवण्यात आलाय. 

सुनावणीत एक मोठा युक्तीवाद

दरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा युक्तीवाद. डिएसके यांनी न्यायालयात तिस-यांदा दिलेली पैसे भरण्याची हमी हा बनाव होता, असा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. 

१०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली

बुलढाणा अर्बन बॅंकेने डीएसके यांची संपत्ती विकत घेऊन त्यांना, १०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण मुळात जी संपत्ती डिएसके यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेला सादर केली होती. 

संपत्तीवर सरकारचं एमिनेटीस आरक्षण

ती सगळी संपत्ती आधीच महाराष्ट्र बॅंकेकडे गहाण आहेत. तर काही संपत्तीवर सरकारचं एमिनेटीस आरक्षण आहे. ही धक्कादायक माहिती विशेष सरकारी वकील वि. रा. शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली.