फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजेवरून वाद

 शैक्षणिक संस्थेत धार्मिक समारंभ घेण्याला काही संघटनांनी विरोध दर्शवलाय.

Updated: Aug 24, 2018, 01:42 PM IST

पुणे : पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजा घालण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय. शैक्षणिक संस्थेत धार्मिक समारंभ घेण्याला काही संघटनांनी विरोध दर्शवलाय. फर्ग्यूसनच्या कार्यालयात दरवर्षी श्रावणात सत्यनारायण पुजा घालण्यात येते. आजवर तिला कोणी विरोध केला नव्हता. मात्र यावर्षी ही पुजा वादात सापडली आहे. यापुर्वी महर्षी कर्वे सामाजिक शास्त्र महाविद्यालयात याच कारणावरून वाद झाला होता.

विद्यार्थी संघटनांचा विरोध 

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेला विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला ..शासकीय कार्यालयांमध्ये पूजा करता येणार नाही असं सांगत ही पूजा थांबविण्यासाठी  लोकतांत्रिक जनता दल  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात गर्दी केली... महाविद्यालयाचे प्राचार्य  राजेंद्र परदेशी यांच्या कार्यालयात ही पुजा  करण्यात आली होती.