नर्सेस आणि बाऊंसरमध्ये हाणामारी, राड्याचा व्हिडिओ व्हायरल

 पुण्यातल्या जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये तुफान राडा

Updated: Dec 24, 2020, 08:24 PM IST

पुणे : पुण्यातल्या जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये तुफान राडा झाला. हॉस्पिटलमधल्या नर्सेस आणि बाऊंसरमध्ये हाणामारी झाली. इथे काम करणाऱ्या नर्सेस आणि वॉर्ड बॉईजचे पगार रखडलेले आहेत. ते आज दिले जात होते. त्याच दरम्यान तिथल्या बाऊंसर्स आणि हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांसोबत त्यांची वादावादी झाली. यातून दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना भिडले. घटनेनंतर दोन्हीकडील कर्मचारी तक्रार देण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गेले.