Pune News : हृदयद्रावक! अभ्यासासाठी आई ओरडली म्हणून 13 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई अभ्यास कर म्हणून ओरडली या कारणाने एका 13 वर्षीय मुलाने धक्कादायक कृत्य केलंय. 

नेहा चौधरी | Updated: Feb 3, 2024, 07:48 AM IST
Pune News : हृदयद्रावक! अभ्यासासाठी आई ओरडली म्हणून 13 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल  title=
Pune News Mother shouted for study thirteen year old boy Shocking act Crime maharashtra

Pune Suicide News: पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई सतत अभ्यास कर म्हणून ओरडत होती म्हणून एका 13 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. हा मुलगा आठवीत असल्याने आई त्याला अभ्यासावरुन सतत खडसावत होती. हा राग मनात ठेवून त्याने राग येऊन गळफास लावून आत्महत्या केली. जतीन असं त्या मुलाच नाव आहे. 31 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता ही घटना घेतली. घटनेनंतर जतीनला ताबडतोब पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे घरावर दु:खाचं डोंगर कोसळल आहे. 

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवली आहे. पोलिसांना कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आईने जतीनला अभ्यास कर यासाठी ओरडल आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीला शिकवायला ती खोली बाहेर निघून गेली. आई गेल्यावर जतीनने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं. काही वेळानंतर वडील घरी आल्यावर त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे आई वडिलांना भीती वाटली.

त्यांनी जतीन आतल्या खोलीत नेमकं काय करतोय, तो दरवाजा का उघडत नाही. हे पाहण्यासाठी वडिलांनी त्या खोलीच्या मागच्या दारातून त्यांनी पाहिल असतं. त्याने धक्कादायक कृत्य केलं होतं.
मुलाला असं पाहून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडील कसंबसं त्या खोलीत शिरले आणि त्यांनी जतिनला खाली उतरून हॉस्पिटल गाठलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर पोलिसांनी माहिती दिली आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. 

गेल्या काही वर्षांपासून शाळकरी मुलांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलंय. अभ्यासाचा त्रास, घरगुती टेन्शन, मोबाईच व्यसन आणि मित्रमैत्रीणींसोबतच संबंध यातून मुलांच्या मनावर परिणाम होतो आहे. यातून मुलं धक्कादायक पाऊल उचलताना दिसत आहेत. अशा घटनांनंतर पालक वर्गामध्येही भीतीच वातावरण आहे. मुलांना चुकील्यावर ओरडायचं पण नाही का असा प्रश्न त्यांना सतावतोय. कुठल्या गोष्टीसाठी नाही म्टहलं तर मुलं काही तरी करतील या भीतीने अनेक पालक मुलांच्या इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत. त्याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये मुलांना मानसिक ताण सहन होत नसल्याच धक्कादायक सत्य समोर आलं आहे.