येत्या 48 तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिउष्ण लाटेचा इशारा

येत्या 48 तासांत महाराष्ट्रावर हवामानाचा प्रकोप

शैलेश मुसळे | Updated: May 12, 2018, 02:27 PM IST
येत्या 48 तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिउष्ण लाटेचा इशारा title=

मुंबई : येत्या 48 तासांत राज्यातल्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर येत्या 24 तासास मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यातली पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

या अवकाळी पावसाच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. मागच्या महिन्यातही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. 

दुसरीकडे विदर्भात अतिउष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमान 47 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात येत्या 48 तासात अतिउष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

बातमीचा व्हिडिओ