'मंत्र्यांना कपडे काढून ठोका, तुडवून मारा'

सोयाबीन-कापूस शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते

Updated: Oct 4, 2018, 11:34 AM IST
'मंत्र्यांना कपडे काढून ठोका, तुडवून मारा' title=

अकोला : 'मंत्र्यांना कपडे काढून ठोकून काढा, तुडवून-तुडवून मारा, पोलीसही काहीच करणार नाही' असं प्रक्षोभक अन् वादग्रस्त विधान खासदार राजू शेट्टींनी केलंय. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या निंबा गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आयोजित केलेल्या सोयाबीन-कापूस शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कापूस-सोयाबीनच्या प्रश्नावर 19 ऑक्टोबरपासून विदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राजू शेट्टींनी दिलाय.