व्हिडिओ : खंडणी मागितल्याच्या आरोपांवर राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया

आपल्यावर झालेले आरोप निराधार असून त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळचे आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी दिलीय.  

Updated: Sep 8, 2017, 07:29 PM IST
व्हिडिओ : खंडणी मागितल्याच्या आरोपांवर राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया title=

यवतमाळ : आपल्यावर झालेले आरोप निराधार असून त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळचे आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी दिलीय.  

सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार केल्यानेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शर्मांना फोन केला यावेळी पैश्यांची मागणी केलेली नाही तसंच धमकीही दिली नाही. उलट कंत्राटदार शर्मांनीच आपल्याला धमकी दिली, असा आरोप आमदार राजू तोडसाम यांनी केलाय. 

कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्याकडे बिल मंजुरीसाठी २० लाख खंडणी मागत असल्याची कथित ध्वनिफीत व्हायरल झालीय. 

विशेष म्हणजे, कंत्राटदार येरावार यांच्याकडे जाण्याची भाषा करताच आमदार थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आहेत.