वाळुमाफियांचा नायब तहसीलदारांवर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

वाळुमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला

Updated: Jul 8, 2019, 08:00 PM IST
वाळुमाफियांचा नायब तहसीलदारांवर जेसीबी घालण्याचा प्रयत्न title=

नांदेड : वाळुमाफियांची दादागिरी किती वाढली याचा प्रत्यय देणारी नांदेड जिल्ह्यातील घटना मोबाईलमध्ये चित्रीत झाली आहे. वाळुमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांवर जेसीबी घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर नायब तहसीलदारांनी 10 किलोमीटर पर्यंत जेसीबीचा पाठलाग केला. मात्र भरधाव वेगात जेसीबी चालक पसार झाला. 

नांदेडमधील गंगाबेट रेतीघाटावर महसुल विभागाने जप्त केलेली वाळु चोरली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. ही चोरी रोखण्यासाठी नायब तहसीलदार मुगाजी काकडे आणि तलाठी मोहसील शासकीय वाहनातुन गेले. पण तहसीलदारांची गाडी पाहताच जेसीबी चालकाने भरधाव वेगात गाडीला धक्का देत पळ काढला.