सांगलीत पालिका - ठेकेदार वादात थांबले अंत्यसंस्कार

सांगली महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या वादात, वृद्धाश्रमातील एका मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार तब्बल दोन तास थांबले होते.  

Updated: May 22, 2018, 01:41 PM IST
सांगलीत पालिका - ठेकेदार वादात थांबले अंत्यसंस्कार  title=

सांगली : लाकडा अभावी, वृद्धाच प्रार्थीव शरीर अंत्यसंस्कारावीना दोन तास सांगलीच्या स्मशानभूमीतच ठेवण्यात आलं होतं. सांगली महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या वादात, वृद्धाश्रमातील एका मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार तब्बल दोन तास थांबले होते. संतप्त नागरिकांच्या रुद्र अवतार पाहताच ठेकेदाराने तिथं लाकडे पाठवली आणि अंत्यसंस्कार झाले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची नागरिकांच्यासाठी मोफत अंत्यसंस्कार योजना आहे. महापालिका अंत्यसंस्कारासाठी अंत्यविधीचे साहित्य मोफत देते. मात्र आज सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारा साठी लाकुड़ न दिल्याने अंत्यसंस्कार थांबला कुपवाड येथील वृद्धाश्रम येथे राहणाऱ्या रमेश खेर यांचे निधन झाले. त्यांचे प्रार्थिव अमरधाम स्मशानभूमीत आणले. मात्र मनपाकडे बिल थकल्याच कारण सांगत, लाकूड देण्यासाठी ठेकेदाराने टाळाटाळ केल्याने मृतदेहावर दोन तास अंत्यसंस्कार करता आले नाहीत. मात्र संतप्त नागरिकांच्या भूमिकेनंतर ठेकेदाराने तिथे लाकडे पाठवली आणि अंत्यसंस्कार झाले.

सांगली महापालिकेची मोफत अंत्यविधी योजनेअंर्तगत वर्क ऑर्डर मिळाली नाही,आणि बिल थकल्याच ठेकेदाराने सांगितले. मात्र लाकडे तात्काळ दिले होते. अंत्यसंस्कारावर परिणाम झाला नाही अशी सारवासारव ठेकेदाराने केली आहे.