नऊ वर्षानंतर सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला वेगळं वळण

या प्रकरणात फिर्यादी असलेले सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनाही यासंदर्भात माहिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

Updated: Apr 18, 2018, 08:12 PM IST
नऊ वर्षानंतर सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला वेगळं वळण title=

पुणे : आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवरून मोठा वाद निर्माण झालाय. सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याचा दावा आयआरबीच्या म्हैसकरांनी केलाय. विशेष म्हणजे यात क्लीन चिट देण्यात आल्याचं पत्रही म्हैसकरांनी आयआरबीच्या समभागधारकांना पाठवल्याचं पुढं आलंय.

आयआरबीच्या समभागधारकांना म्हैसकरांचं पत्रं

मात्र, या वृत्ताला सीबीआयनं अजून अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तसंच या प्रकरणात फिर्यादी असलेले सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनाही यासंदर्भात माहिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

फिर्यादीला क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची माहीती नाही. मात्र, आरोपीला आधीच त्याची प्रत मिळते असा आरोप संदीप शेट्टींनी केलाय. त्यामुळे व्यवस्थेच्या काम करण्याच्या पद्धतीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

संदीप शेट्टी यांची प्रतिक्रिया

आयआरबीच्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. फिर्यादीला क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची माहिती नाही. मात्र, आरोपीला आधीच त्याची प्रत मिळते... सिस्टीम कशा पद्धतीने काम करतेय, याचं हे उदाहरण आहे अशा शब्दांत सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.