वाहनधारकांसाठी मोठी बातमी! 'हे' कागदपत्र नसेल तर होईल कारवाई

नागपूरात स्कुल व्हॅन (napur school bus news) आणि बसेसची 3500 वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेली आहे. यातील जवळपास 700 वाहन धारकांनी अद्याप फिटनेस (fitness) करून घेतलेले नसल्याची धक्कादायक बाब (shocking news) समोर आली आहे. 

Updated: Nov 24, 2022, 05:14 PM IST
वाहनधारकांसाठी मोठी बातमी! 'हे' कागदपत्र नसेल तर होईल कारवाई  title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात अनियंत्रित स्कुल वाहनाच्या चाकाखाली येऊन दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यांचा (Student dies after hitting to school bus) मृत्यू झाला. या घटनेनंतर स्कूल व्हॅन आणि बसने जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा (studnet secutity) प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूरात स्कुल व्हॅन (napur school bus news) आणि बसेसची 3500 वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेली आहे. यातील जवळपास 700 वाहन धारकांनी अद्याप फिटनेस (fitness) करून घेतलेले नसल्याची धक्कादायक बाब (shocking news) समोर आली आहे. तेच मागील तीन महिन्यात फिटनेस नसलेल्या स्कुल वाहनावर कारवाई करण्यात आल्याचा दावा परिवहन विभागाकडून करण्यात आला आहे तसेच काही वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. (school bus and car drivers will need to have fitness certificate rto marathi news)

कालच असाच एक प्रकार घडल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे अशा गाड्यांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं झालं आहे. अशावेळी आता फिटनेस नसणाऱ्या स्कुल व्हॅन आणि बसेस आता आरटीओच्या (RTO) रडारवर आली आहेत. आता जर तुम्ही स्कूल बस किंवा कार ड्रायव्हर असाल तर तुमच्यासाठी आता फिटनेस सर्टिफिकेट (Fitness Certificate) असणे बंधनकारक आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल. 

हेही वाचा - 14 वर्षाच्या शाळकरी पोराचे Instagram status पाहून का गाठावं लागलं Police Station?

काय घडला होता प्रकार? 

या अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा तपासणी मोहीम कडक परिवहन विभागाने कडक केली आहे. यामध्ये दिवसभरात अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. मागील 24 तासात 33 शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तेच 15 स्कुल वाहन विना फिटनेस कागपत्रासह (Cerificate Complusory) रस्त्यावर मिळून आल्याने जप्त करण्यात आली आहे. तसेच 700 स्कुल वाहन धारकांना यापूर्वीच फिटनेस करून घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी झी 24 तासला दिली. 

हेही वाचा - दुर्दैव! परदेशात मिळाली नोकरीची ऑफर पण घडलं असं की...

फिटनेस नसलेल्या स्कूलबसवर कारवाई कशी केली जाते? 

स्कुलवाहनची चेक लिस्ट आहे. त्यामध्ये बसच्या आत दप्तर ठेवण्यासाठीची जागा, फर्स्ट एड किट, अग्निशामक सिलेंडर आणि इमर्जन्सी एक्झिट (emergency exit) यासह काही बाबींची तपासूनच फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. यासाठी दर महिन्याला तपासणी मोहीम घेतली जाते. यात मागील तीन महिन्यात 300 वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. फिटनेस आणि आवश्यक कागपत्र नसलेल्या 45 वाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या जप्तीत आहे. स्कुल व्हॅन संदर्भात असलेल्या शालेय समितीने नियमित दर महिन्याला बैठका घेऊन त्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाला दिली पाहिजे. यात समितीत असलेल्या पालकांनी सुद्धा जागृत राहून वाहनांची कागपत्र तपासली पाहिजे. त्रुटी असल्यास शाळा किंवा आरटीओकडे तक्रार (complaint) केली पाहिजे असे आवाहन केले. आवश्यक कागदपत्र असल्यावरचं स्कुल वाहन धारकांनी वाहन रस्त्यावर उतरावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.