मेधा गाडगीळ, सुधीर श्रीवास्तव दीर्घ रजेवर, सेवा ज्येष्ठतेचा निकष न पाळल्यान नाराजी

राज्याच्या जवळपास ५९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच  मंत्रालयातली नाराजी चव्हाट्यावर आलीय. 

Updated: May 3, 2018, 09:09 AM IST

दीपक भातुसे,झी मीडिया मुंबई :  राज्याच्या जवळपास ५९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच  मंत्रालयातली नाराजी चव्हाट्यावर आलीय.  राज्यातले सर्वात मोठे सनदी अधिकारी सरकाराच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या सुट्टीवर गेले आहेत. मुख्य सचिवपदी डी के जैन यांची नियुक्ती त्यांची सेवा ज्येष्ठतेचे निकष डावलून करण्यात आल्यानं जैन यांना सेवेत ज्येष्ठ असणाऱ्या मेधा गाडगीळ आणि सुधीरकुमार श्रीवास्तव दीर्घ रजेवर गेलेत. जैन राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८३ च्या बॅच मधील जेष्ठतेनुसार मेधा गाडगीळ पहिल्या क्रमांकावर, सुधीरकुमार श्रीवास्तव दुसर्‍या क्रमांकावर तर डी. के. जैन तिसर्‍या क्रमांकावर आहेत.यामुळे नाराज झालेल्या मेधा गाडगीळ एका महिन्याच्या दीर्घ रजेवर गेल्या आहेत.  तर दोन दिवसांच्या रजेवर असलेले सुधीर कुमार श्रीवास्तव यांनी आपली दोन दिवसांची रजा वाढवली आहे.