शेगांव संस्थानाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 

Updated: Apr 11, 2020, 11:40 AM IST
शेगांव संस्थानाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय  title=

मयुर निकम , झी मीडिया , बुलडाणा : कोरोनाग्रस्तांच्या रोजच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडतोय. बुलडाणा जिल्ह्यात ९ एप्रिलपर्यंत एकूण १७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातील विविध भागांमधील असल्याने जिल्ह्यात बुलडाणा , खामगाव आणि शेगांव येथे अलगिकरण आणि विलगिकरण कक्ष बनवण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी सुटसुटीत जागेचा अभाव असल्याने सेवाभावी संस्थान स्वतःहून समोर आलेत.

त्यांनी हा प्रश्न सोडवण्यास मदत केली असून यामध्ये शेगांव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने जवळजवळ ११०० रुग्णांना ठेवता येईल अशी व्यवस्था केली आहे.दरम्यान बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ सुमन चंद्रा आणि उपजिल्हाधिकारी डॉ रामेश्वर पुरी यांनी दोन्ही विलगिकरण कक्षांची पाहणी केली. यामध्ये शेगावमधील विसावा भक्तनिवासात ५०० आणि भुस्कुटी मळा येथे ६०० बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून इथे विलगीकरणं म्हणजेच क्वारंटाईन केलेल्यांना चहा नाश्ता आणि जेवण्याची व्यवस्था संस्थानकडूनच करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ पुरी यांनी दिली आहे. 

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी वेगवेगळ्या संस्था मदतीसाठी पुढे आले आहेत. राज्यात आतापर्यंत १५७४ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ११० रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना विलगिकरण कक्षात ठेवणं महत्वाचं आहे. अशावेळी शेगाव संस्थेने पुढाकार घेतला आहे.