Shri Swami Samarth : कोरोनाचा धोका लक्षात घेता अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय

Corona Update : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. भारतातही कोरोनाचे चार रुग्ण आढळलं आहेत. त्यात दिल्लीतील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाच्या भीतीमुळे मंदिराबद्दल अनेक नियम लागू करण्यात येतं आहे. 

Updated: Dec 24, 2022, 09:55 AM IST
Shri Swami Samarth : कोरोनाचा धोका लक्षात घेता अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय title=
Shree Swami Samarth Samadhi Math Akkalkot Mask Is Mandatory In Temple Corona Update nmp

Mask Is Mandatory In Temple : चीनमध्ये कोरोनाने थैमान (China Corona Update) घातला आहे. अशातच कोरोना हळूहळू पुन्हा एकदा संपूर्ण जगाला विळखा घालतं आहे. भारतातही कोरोनाची (India Corona Update) नवी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येतं आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या (Christmas and New Year) स्वागतासाठी अनेक भारतीय घराबाहेर पडतात. राज्यात अनेक लोक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिरात जातात. त्यामुळे कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंदिर संस्थानांनी (Mask Is Mandatory In Temple) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त आहात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय

जर तुम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी (Shree Swami Samarth Samadhi Math, Akkalkot) जाणार असाल तर मंदिर समितीने घेतलेला निर्णय आधी जाणून घ्या. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. मंदिर समितीने भक्तांना (Shri Swami Samarth ) आवाहन केलं आहे की, त्यांनी मास्क घालून मंदिरात यावं. यापार्श्वभूमीवर मंदिर समितीने भक्तांना मास्कचं वाटपही केलं आहे.  (Shree Swami Samarth Samadhi Math Akkalkot Mask Is Mandatory In Temple  Corona Update)

या मंदिरातही दर्शनासाठी नियम 

कोरोनाचा धोका लक्षात घेता आणि नवीन वर्षामध्ये भक्तांची संख्या वाढते म्हणून राज्यातील प्रसिद्ध मंदिर शिर्डीतील साईबाबा (Shirdi Saibaba) आणि कोल्हापूर अंबाबाई मंदिरात खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने (Shri Saibaba Sansthan Trust) आवाहन केलं आहे. 

हे नियम पाळा

साई भक्तांना मास्कची सक्ती
सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करा
ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी

या मंदिरातही खबरदारीचे उपाय

नवीन व्हेरिएंट हा अद्याप महाराष्ट्रात (Maharashtra news) आणि कोल्हापुरात (kolhapur news) दाखल झाला नसला तरी काळजी घेणे महत्त्वाचं असल्याचं कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नियम कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील (ambabai mandir) कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली असून येणाऱ्या काळात करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांना सुद्धा मास्क सक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. 

IMA ने जारी केली नियमावली

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) ने नियमावली जाहीर केली आहे. 

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा (Mask Mandatory)
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा (Social Distancing)
सॅनिटायझर आणि साबनाने हात स्वच्छ करा (use sanitizer)
राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना जाणं टाळा
आंतरराष्ट्रीय यात्रा करत असाल तर सावधगिरी पाळा
ताप, घसा खवखवणे, खोकला अशी लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासून घ्या (Symptoms)
लसीकरण झालं नसेल तर तातडीने करुन घ्या, बूस्टर डोस घ्या