खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार

सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती स्कायमेट या हवामान खात्यानं दिली आहे.

Updated: Apr 4, 2018, 08:46 PM IST
खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार title=

मुंबई : सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती स्कायमेट या हवामान खात्यानं दिली आहे. यंदा पावसाळा चांगला राहणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेनं व्यक्त केलाय. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. येत्या हंगामात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतला पाऊस १०० टक्के राहण्याची शक्यता आहे. यात पाच टक्के अंदाज चुकण्याची शक्यताही स्कायमेटनं व्यक्त केलीय. सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता ५५ टक्के असल्याचंही स्कायमेटनं आपल्या हवामान अंदाजात सांगतिलं आहे.