जळगाव पालिकेच्या ६९ कर्मचाऱ्यांना कामावरून केल बडतर्फ

महापालिकेच्या ६९ सह्याजीराव कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केल्यानंतर पाणीपुरवठा विभागातील काही महिला कर्मचाऱ्यांनी महासभेत महापौरांच्यासमोर अश्रूंना वाट मोकळी केली.

Updated: Nov 16, 2017, 11:56 PM IST
जळगाव पालिकेच्या ६९ कर्मचाऱ्यांना कामावरून केल बडतर्फ title=

जळगाव : महापालिकेच्या ६९ सह्याजीराव कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केल्यानंतर पाणीपुरवठा विभागातील काही महिला कर्मचाऱ्यांनी महासभेत महापौरांच्यासमोर अश्रूंना वाट मोकळी केली.

आम्ही कामात कोणतीही कसर ठेवली नसताना कामचुकरपणाचा ठपका ठेवत बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचं या महिला कर्मचाऱ्यांनी महापौरांना सांगितलं. 

परंतु प्रशासकीय कारवाई असल्यानं ती मागे घेण्याबाबतची हतबलता यावेळी महापौरांनी बोलून दाखविली. यामुळं निवेदन देऊन बडतर्फ कर्मचा-यांना पुन्हा बोलवण्यात आलं. काही सदस्यांनी महापालिकेच्या महासभेतदेखील हा प्रश्न उपस्थित केला.