काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्राचा कृषी मंत्री असताना... शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

PM Modi in Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यवतमाळ येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. 

वनिता कांबळे | Updated: Feb 28, 2024, 07:10 PM IST
 काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्राचा कृषी मंत्री असताना...  शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल title=

PM Narendra Modi in Yavatmal :  पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यवतमाळ येथे  पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत   पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

NDA सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काय मिळत होते? त्यावेळेस शेतकरी देखील महाराष्ट्राचेच होते. तेव्हा दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर व्हायचे. पण, शेतकऱ्यांपर्यंत काहीच पोहचायचे नाही. शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी टीका केली आहे.  शरद पवार कृषीमंत्री होते, तेव्हा केंद्रात यूपीएचं भ्रष्ट सरकार होतं असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मात्र, आता कोट्यावधी रुपये काही क्षणात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. काँग्रेस सरकारच्या काळात दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी एक रुपया दिला जायचा. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत फक्त 15 पैसे पोहचायचे. शेतकऱ्यांच्या पैशावर मधल्या मधे डल्ला मारला जायचा असा आरोप पंत्परधान मोदी यांनी केला.  

लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. काँग्रेसचे सरकार असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटींवर डल्ला मारला असता असं देखील मोदी म्हणाले. 
यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे आयोजीत करण्यात आलेल्या बचत गट मेळाव्याला पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले.