राज्यासाठी रविवार ठरला घातवार

अपघातात अनेक भाविक जखमी

Updated: Jul 22, 2018, 04:29 PM IST
राज्यासाठी रविवार ठरला घातवार  title=

मुंबई : रविवार घातवार ठरला आहे. राज्यात विविध रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी झाले आहेत. अहमदनगर-सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाला आहे.  स्कॉर्पिओ-ट्रकच्या अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील पाटेवाडीजवळ हा अपघात घडला. दुसरा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर टेंभूर्णीजवळ झाला. लक्झरी आणि क्रुझरच्या धडकेत 20 भाविक जखमी झाले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील आंबवणे इथं रिक्षा आणि पिकअप जीपच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या ओढ्याच्या पुलावरुन खाली कोसळल्या.