प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो... सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा

तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत. 

Updated: Nov 25, 2023, 05:11 PM IST
प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो... सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा title=

sushama andhare : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या वादात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या आंदोलनाचा फोकस हललाय, अशी टीका त्यांनी केलीय. तर आपण स्वतःला आर्थिक सामाजिक मागास म्हणत असू तर  शंभर - शंभर जेसीबींनी फुलं उधळली जातात हे विसंगत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर सुषमा अंधारे यांच्यावर टीका होत आहे. सुषमा अंधारे खुलासा करत आपली बाजी मांडली आहे. 

सुषमा अंधारे यांचा खुलासा

गेल्या दोन दिवसांपासून माझ्या नावाने माझ्या तोंडी काही विधान घालून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातल्या कुठल्याही छापील विधानांशी मी अजिबात सहमत नाही. माझी अधिकृत भूमिका ही मी वारंवार स्पष्ट केली आहे आणि माझ्या फेसबुक अकाउंट वर ती उपलब्ध आहे.  गेल्या दोन दिवसांपासून हा संभ्रम पसरवणारे काही मुख्य फेसबुक अकाउंट जेव्हा मी तपासले तेव्हा मला ते जास्तीत जास्त अकाउंट भाजपा मनसे आणि ज्या गद्दारांच्या इलाख्यात जाऊन सभा घेतल्या त्यांच्या छुप्या समर्थकांचे आहेत असे जाणवले.  परंतु हा संभ्रम ज्या जोरदार पद्धतीने पसरवण्याचा प्रयत्न झाला त्यातून काही आमचे मराठा बांधव दुखावले गेले.  जे शिवसेना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी व इतर पक्ष संघटनांची ही संबंधित आहेत. त्यांच्या भावनांचा मी आदर करते. शिवसेना हा सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष आहे. 

गद्दारांच्या इलाख्यातून आव्हान देत  आपण भाजपा आणि या सगळ्या खोके गँगचा जो बुरखा पडत आहोत त्याने त्रस्त झालेले लोक जे मला ईडी सीबीआय किंवा कुठलेही क्रिमिनल रेकॉर्डमध्ये अडकवू शकत नाही ते लोक माझ्या संबंधाने माझा भवताल भ्रमित करू पाहत आहेत.  अशा भामट्यांपासून सावध रहा. 

ज्या मराठा बांधवांना या सगळ्यांमुळे त्रास झालाय त्यांनाही आमची विनंती असेल की तुमच्या इतकाच त्रास आणि वेदना मलाही या सगळ्या गैरसमजामुळे होत आहेत.
जे लोक आपापल्यामध्ये मराठा ओबीसी करत वाद लावण्याचा भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे अशा सगळ्यांच्या पासून सावध होऊया. एवढीच आपल्याला विनंती करेन असे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.