तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाचा महाराष्ट्रात पहिला सरपंच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात BRSने ग्रामपंचायतीत पहिलं खातं उघडल आहे. भारत राष्ट्र समितीच्या सुष्मा मुळे यांची गंगापूर तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. 

Updated: Jun 24, 2023, 04:30 PM IST
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या  BRS पक्षाचा महाराष्ट्रात पहिला सरपंच title=

BRS Sarpanch In Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणला आहे. BRS पक्षाने महाराष्ट्रात आपलं खात उघडले आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात BRS ने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ यश मिळवल आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सावखेड्याच्या ग्रापमपंचायतीत  सरपंचपदी BRS पक्षाच्या महिला सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती अर्थात BRS ने ग्रामपंचायतीत पहिलं खातं उघडलं आहे. भारत राष्ट्र समितीच्या सुष्मा मुळे यांची गंगापूर तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. सावखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये सुष्मा मुळे यांची सर्व सदस्यांच्या वतीने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए. सी. हुगे यांच्या निदर्शनाखाली पार पडली.

ग्रामपंचायतीमध्ये BRSचा उमेदवार विजयी

छत्रपती संभीजनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीतून BRSनं महाराष्ट्रात खातं उघडले होते. गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ ग्रामपंचायतीमध्ये BRSचा उमेदवार विजयी झाला होता. गफूर सत्तार पठाण 115 मतांनी विजयी झाले होते. BRS अर्थात भारत राष्ट्र समिती हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत BRSमध्ये प्रवेश

आपल्या अदांनी घायाळ करणा-या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत BRSमध्ये प्रवेश केला आहे. 2021मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात प्रवेश केला.

BRS, वंचितकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही; अजित पवारांचा इशारा

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसमध्ये महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांचे एनकमिंग सुरूच आहे. 
राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या रौप्यमहोत्सवी मेळाव्यातून अजित पवारांनी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले होते.काही माजी मंत्री आपल्या जिल्ह्यातून आमदार निवडून आणू शकत नाहीत असा टोला अजित पवारांनी लगावला होता. त्याचवेळी BRS, वंचितकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असंही अजित पवारांनी म्हणाले होते.