ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या १२१ वर, एकाचा मृत्यू

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय.

Updated: Apr 9, 2020, 03:40 PM IST
ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या १२१ वर, एकाचा मृत्यू title=

ठाणे : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार मिळून यावर कार्यवाही करत आहे. कोरोना रुग्ण आढळलेला परिसर क्वारंटाईन करण्यात येतोय. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी केली जातेय. दरम्यान मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय.

ठाणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या १२१ वर पोहचली आहे. तर ठाणे शहरात कोरोनाचा आता पर्यंत एक बळी गेला आहे. 

जिल्हा रुग्णालयात एकूण 33 कोरनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालिका हद्दीत एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या २६ वर पोहचल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आणि पालिका प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.

ठाणे शहरातील बाजारपेठ इतरत्र हलवण्याची पालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. मास्क न लावणाऱ्यांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फंसळकर यांचे आदेश आहेत. 

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची राहण्यासाठी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. 

ठाणे कोपरी संघर्ष समिती मार्फत घराघरा पर्यंत अन्न धान्य पुरवण्याचे काम सुरू आहे. मुंब्रा येथील कौसा मधील काळसेकर खाजगी रुग्णालयात एक कर्मचारी कोरोना बाधित आधळून आल्याने त्याला सिव्हिल रुग्णालयात केले दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर काळसेकर रुग्णालय सील करण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेतर्फे या हद्दीत १५ ठिकाणं कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.