शाळेच्या विश्वस्ताकडून मुलांना फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण

ठाण्यातल्या भाजी मार्केटमधल्या गौतम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 16, 2018, 03:34 PM IST
शाळेच्या विश्वस्ताकडून मुलांना फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण title=

ठाणे : ही धक्कादायक ठाण्यात घडली आहे. शाळेच्या विश्वस्तांच्या पत्नीनं तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आहे. ठाण्यातल्या भाजी मार्केटमधल्या गौतम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय.

विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून संताप

या सगळ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात न्यावं लागलं. या शाळेच्या वार्षिकोत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यावेळी विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून विश्वस्तांची पत्नी शिल्प गौतम संतापल्या, त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी भरण्याच्या पाईपनं मारहाण केली.

हातपाय मोडेपर्यंत मारलं...

यात काही जणांचा हात फ्रॅक्चर झालाय, काहींच्या हाताला दुखापत झालीय. यावेळी शिल्पा गौतम यांनी विद्यार्थ्यांना शिविगाळ केल्याचा आरोपही केला जात आहे. शाळेकडून याबद्दल बोलायला नकार देण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करीत आहेत.