शाळेच्या पटांगणात प्रार्थना सुरु असताना झाड कोसळले... २० मुली जखमी...

पाऊस चालू झाल्यावर झाड कोसळण्याच्या घटना अनेकवेळा घडत असतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील कापडे बुद्रुक या गावी घडली आहे. शाळेच्या पटांगणात प्रार्थना सुरू असताना मुलींवर झाड कोसळले. या घटनेमध्ये २० विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.

Updated: Jun 28, 2017, 07:36 PM IST
शाळेच्या पटांगणात प्रार्थना सुरु असताना झाड कोसळले... २० मुली जखमी... title=

रायगड : पाऊस चालू झाल्यावर झाड कोसळण्याच्या घटना अनेकवेळा घडत असतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील कापडे बुद्रुक या गावी घडली आहे. शाळेच्या पटांगणात प्रार्थना सुरू असताना मुलींवर झाड कोसळले. या घटनेमध्ये २० विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.
जखमी विद्यार्थिनींना लगेच पोलादपूरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामधील ३ विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कापडे बुद्रुक येथील श्री वरदायिनी विद्यालयाच्या पटांगणात सकाळी १०.१५ च्या सुमारास प्रार्थना सुरू होती तेव्हा शाळेजवळ असेलेले झाड पटांगणात कोसळले आहे. या घटनेत २० विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. या सर्व विद्यार्थिनी सहावी ते नववी इयत्तेतील आहेत.
पोलादपूर रुग्णालयात दाखल केलेल्या मुलींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.