'त्यांना स्किझोफ्रेनिया झालाय', हकालपट्टीनंतर विजय शिवतारे यांची जहरी टीका

विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेत्यावर टीका केली आहे.

Updated: Jul 16, 2022, 10:24 PM IST
'त्यांना स्किझोफ्रेनिया झालाय', हकालपट्टीनंतर विजय शिवतारे यांची जहरी टीका title=

पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सामनातून याबाबत माहिती देण्यात आली. या बातमीनंतर शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

खासदार संजय राऊत यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधली, त्यांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यामुळेच पक्षाची वाताहत असो वा माझी हकालपट्टी यामागे संजय राऊत हेच आहेत अशी जहरी टीका शिवसनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. 

विजय शिवतारे म्हणाले की, आपण स्वतःच 29 जून रोजी बाहेर पडलो होतो. त्यामुळे हकालपट्टीचा प्रश्नच नाही. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा मनोमिलन घडावं अशी इच्छा असली तरी ते एका बाजूने शक्य नसल्याचंही शिवतारे म्हणाले.