आंबोली घाटात सहाशे फूट खोल दरीत कोसळला ट्रक

सिंधुदुर्गच्या आंबोलीत मुख्य धबधब्याजवळ घाटात सुमारे सहाशे फूट खोल दरीत ट्रक कोसळलाय.  

Updated: Aug 8, 2018, 10:43 PM IST
आंबोली घाटात सहाशे फूट खोल दरीत कोसळला ट्रक  title=

आरोस : सिंधुदुर्गच्या आंबोलीत मुख्य धबधब्याजवळ घाटात सुमारे सहाशे फूट खोल दरीत ट्रक कोसळलाय. या ट्रकमध्ये चालक आणि क्लीनर असावेत असा अंदाज आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडलीय. ब्रेक फेल झाल्यामुळे ही अपघात घडल्याची शक्यता आहे. 

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी वाहनचालकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र धुकं आणि काळोख यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.