नवरात्र काळात तुळजाभवानीचे पेड दर्शन

नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आता तुम्हाला ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Updated: Sep 16, 2017, 08:29 PM IST
नवरात्र काळात तुळजाभवानीचे पेड दर्शन title=

उस्मानाबाद : नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आता तुम्हाला ३०० रुपये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी भाविकांना १०० रुपये मोजावे लागत होते.. त्यात २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

घटस्थापनेपासून अश्विन पोर्णिमेपर्यंत ही दरवाढ लागू असणार आहे.. या काळात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहेत. या व्हीआयपी दर्शनाच्या रांगेतून पेडदर्शन सुरु केलं जाणार आहे.

दरम्यान निशुल्क दर्शनाची सोय मात्र सुरू राहणार आहे.  या निर्णयामुळे नवरात्रात गर्दीचा फायदा घेऊन व्हीआपी दर्शन देतो असं सांगून भाविकांची फसवणूक केली जाते अशा घटनांना आता आळा बसणार आहे.