हिंगोलीमध्ये वीज पडून दोन जण ठार तर 4 जण जखमी

जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातल्या जांब आंध येथे वीज पडून दोन जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रक़ृती गंभीर असल्याचं समजतंय.

Updated: Jun 6, 2017, 05:22 PM IST
हिंगोलीमध्ये वीज पडून दोन जण ठार तर 4 जण जखमी title=

हिंगोली : जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातल्या जांब आंध येथे वीज पडून दोन जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रक़ृती गंभीर असल्याचं समजतंय.

पारडामध्ये वीजेचा खाब पडल्यानं 3 शेळ्यांचा मृत्यू झाला. वादळी वा-यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. तर औंढा नागनाथ तालुक्यात भोसी शइवारात वीज पडून तिघे जखमी झालेयत. शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. नांदेडच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरूयत. तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली.