Video : चंद्रा गाणे सुरु होताच चिमुकला उभा राहिला अन्.... तुम्हीही म्हणाल असं नाचता आलं पाहिजे

Viral Video : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. अगदी विदेशाताही या गाण्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या शाळकरी मुलाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

Updated: Mar 16, 2023, 05:53 PM IST
Video : चंद्रा गाणे सुरु होताच चिमुकला उभा राहिला अन्.... तुम्हीही म्हणाल असं नाचता आलं पाहिजे title=

Viral Video : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिच्या चंद्रमुखी (Chandramukhi) चित्रपटातील 'चंद्रा' (chandra) गाण्याने सगळ्यांनाच अक्षरक्षः वेड लावलं आहे. कार्यक्रम कोणताही असो त्यात चंद्रा हे गाणं वाजल्याशिवाय आणि त्याच्यावर नाचल्याशिवाय तो पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यामुळे चंद्रा या गाण्याचे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण ठेका धरताना दिसत असतात. चंद्रा गाण्यावर अनेकांनी तुफान डान्स केलाय आणि याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) झालेत. असाच एका कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. महाराष्ट्राच्या श्री सिद्धनाथ एज्युकेशन अकादमीच्या सरस्वती विद्या निकेतनमध्ये हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काही मुली 'चंद्रा' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. दुसरीकडे गर्दीमध्ये आपल्या मित्रांसह बसलेल्या एका मुलाने अप्रतिम डान्स करुन सर्वांचे लक्ष्य वेधले. त्या मुलाचा डान्स कोणीतरी कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला. यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या व्हिडीओवरुनच आता अमृता फडणवीसच्या गाण्याने किती जणांना वेड लावलं आहे याची कल्पना येईल.

अंपायरलाही आवरला नाही मोह

दरम्यान चंद्रा या गाण्यावर नाचण्याचा मोह एका अंपायरलाही आवरता आला नाही आणि भर सामन्यातच त्याने या गाण्यावर डान्स सुरु केला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये एका स्थानिक टेनिस क्रिकेट टूर्नामेंटमध्ये चंद्रा हे गाणं वाजवताच अंपायर कसलाही विचार न करता या गाण्यावर डान्स करायला सुरुवात करतो.