Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्...

Akola Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली आणि...

Updated: Nov 27, 2022, 10:40 AM IST
Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्... title=
video woman falling running train Akola viral on Social media nmp

Train Viral Video : सतत सांगण्यात येतं की, धावती लोकल (Mumbai Local) किंवा ट्रेन (train) पकडू नका. रेल्वे (Railway) स्टेशनवरही वारंवार या घोषणा करण्यात येतात. पण तरीही देखील धावत्या ट्रेनमधून प्रवासी खाली पडल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) झाले आहेत. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये (CCTV) या दुर्घटना कैद झाल्या आहेत. धावत्या ट्रेनमधून महिला खाली पडली आणि...ही थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. 

धक्कादायक व्हिडिओ (Shocking video)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन (Railway platform) एक ट्रेन सुटली आणि थोड्याच वेळात नऊवारी नेसलेली एक महिला अचानक धावत्या ट्रेनमधून खाली पडली. तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तिथून जात असलेल्या आरपीएफ पोलिसाची नजर पडली. तो धावत गेला आणि त्याने महिलेला प्लॅटफॉर्मवर खेचून घेतलं. जर या आरपीएफ पोलिसाला (RPF Police) जरादेखील उशिर झाला असता तर महिलेने आपल्या जीव गमावला असता. या दुर्घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (video woman falling running train Akola viral on Social media )

कुठे घडली ही घटना? 

ही घटना अकोला रेल्वे स्टेशनवर (Akola Railway Station) घडली आहे.अकोला रेल्वे स्थानकावर काचीगुडा एक्सप्रेस जात असताना ही दुर्घटना घडली.  मिळालेल्या माहितीनुसार बी. आर. धुर्वे असं महिलेला वाचविणाऱ्या देवदूताचं नाव आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेटकरी देवदूत बी. आर. धुर्वे यांचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर (Twitter) अक्षय बैसाणे या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.