चंद्रपुरात ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे. 

Updated: Oct 15, 2017, 05:25 PM IST
चंद्रपुरात ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे. 

उद्या होणा-या मतदानासाठी आज तहसील कार्यालयांमधून कर्मचा-यांना निवडणुकीचं साहित्य वाटप करण्यात आलं आणि जरुरी सूचना देऊन रवाना करण्यात आलं आहे. 

यावेळी सरपंच पदासाठी थेट मतदान होणार असल्यामुळे उत्सुकता वाढली आहे. थेट सरपंच निवडीमुळे राजकीय पक्षांच्या ग्रामीण भागातील ताकतीचा अंदाजदेखील या वेळी येणार आहे.