चंद्रपुरात छटपुजेवेळी नर्तिकेचे अश्लिल नृत्य

देशभरात छटपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मात्र, चंद्रपूरच्या राजूरामधील छटपूजा एका वेगळ्याच कारणामुळे गाजली.

Updated: Oct 29, 2017, 11:34 PM IST
चंद्रपुरात छटपुजेवेळी नर्तिकेचे अश्लिल नृत्य title=

चंद्रपूर : देशभरात छटपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मात्र, चंद्रपूरच्या राजूरामधील छटपूजा एका वेगळ्याच कारणामुळे गाजली.

छटपुजेसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर करण्यात आलं. बल्लारपूर-राजूरा शहरातील सार्वजनिक छटपूजा समितीने बिहारच्या एका संगीत चमूला आमंत्रित केलं होतं.

स्थानिक भाजप नेत्यांच्या हस्ते पूजा पार पाडली. नेते पूजा आटोपून गेल्यानंतर स्टेजवरच या अश्लील नृत्याला सुरुवात झाली.

यावेळी उपस्थित अबालवृद्ध, महिलांनी माना खाली घातल्या. मात्र, तिथं उपस्थित असलेल्या आंबटशौकिनांनी या नृत्यांचा आनंद घेत नर्तिकेवर पैसेही उधळले.