हातावर 'मी चोर नाही' म्हणत त्याने आत्महत्या केली...

ट्रक ड्रायव्हर अशोक यांच्यावर कुणाचा दबाव होता का?

Updated: Jun 16, 2021, 05:43 PM IST
 हातावर 'मी चोर नाही' म्हणत त्याने आत्महत्या केली... title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : जिल्ह्यातल्या कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर ट्रकच्या कॅबिनल लटकून गळफस घेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. या गळफास घेतलेल्या ड्रायव्हरच्या हातावर आणि पायवर 'मै चोर नही हू' असे लिहलेलं आढळूनं आलं आहे. त्यामुळं याप्रकरणातला गुंता वाढला असून नवे वळण मिळाले आहे. ट्रक ड्रायव्हj अशोक नागोत्रा यांच्यावर कुणी दबाव आणला होता का? प्रामाणिक असूनही ट्रक मालक आणि पोलिसांनी त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवल्यामुळे नैराश्यात त्यांनी आत्महत्या केली का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे. 

नागपुरात जिल्ह्यातील सावनेर येथील सोयाबीन तेलनिर्माण कंपनीतून चालक अशोख नागोत्रा सोयाबिन तेल बॉक्स घेवून मुंबई भिवंडीच्या दिशेनं निघाले होते. चालकानं वाहनात डिझेल भरण्याकरता नागपूर अमरावती मार्गावर बाजारगाव येथील सातनवरी पेट्रोल पंपावर डिझेल भरलं.त्यानंतर चालक तिथेल झोपला. दहा तारखेला सकाळी उठल्यानंतर ट्रकच्या मागील भागातील ताडपत्री फाटलेली त्यांना दिसली.ट्रकच्या मागील बाजूनं  सोयाबिन तेलाचे बॉक्स चोरीला गेले होते. याबाबत चालकानं ट्रान्सपोर्टरला याबाबत माहिती दिली.

तब्बल 160 सोयाबीन तेलाचे बॉक्स कमी असल्याचं दिसून आले.त्यानंतर ट्रान्सपोर्टर राजेंद्र चव्हाण यांनी 14 जुनला तक्रार नोंदवली.  कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक अशोक नागोत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा ट्रक कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर उभा करण्यात आला होता. ट्रक चालक अशोक नागोत्रा तिथेच झोपला होता. मात्र दुस-या दिवशी अशोक नागोत्रा पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी आणून ठेवलेल्या त्यांच्याच ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले.

पोलीस स्टेशनसमोर ठेवलेल्या ट्रकला गळफास घेतल्याच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे पोस्टमार्टम करताना मृत अशोक नागोत्रा यांच्या हातावर आणि पायवर ‘मै चोर नही हू’ असं लिहलेलं आढळून आलं.त्यामुळं यप्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. ट्रक ड्रायव्हर अशोक यांच्यावर कुणाचा दबाव होता का ? प्रामाणिक असून ट्रान्सपोर्टर आणि पोलिसांनी  चोरीचा ठेवल्याने त्यामुळे  खचून नैराश्यतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल का ?  असे सवाल उपस्थित होतं आहे.याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरतेय.