#METOO ला #WETOO ची साथ, पुण्यातून सुरुवात

लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवू न शकलेल्या सामान्य महिलांच्या मदतीसाठी पुण्यातील महाविद्यालयीन तरुण - तरुणी पुढे आलेत.

Updated: Oct 17, 2018, 10:24 PM IST
#METOO ला #WETOO ची साथ, पुण्यातून सुरुवात title=

पुणे : लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवू न शकलेल्या सामान्य महिलांच्या मदतीसाठी पुण्यातील महाविद्यालयीन तरुण - तरुणी पुढे आलेत. देशात सुरु असलेल्या # मीटू मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी #वीटू म्हणजेच वुई टुगेदर ही मोहीम सुरु केलीय.  

दरम्यान, 'मीटू' मोहीम सुरु झाल्यापासून बॉलिवूडमधल्या अनेक निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी धसका घेतलाय. त्यामुळेच अभिनेता दलीप ताहिल यांनी आगामी चित्रपटातल्या बलात्काराच्या सीनआधी कुठलाही त्रास न झाल्याचं अभिनेत्रीकडून लिहून घेण्यात यावं आणि अभिनेत्रीच्या तशा वक्तव्याचं व्हिडीओ रेकॉर्ड़िंग करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्या अभिनेत्रीनं आपल्याला या सीनदरम्यान कुठलाही त्रास न झाल्याचं सांगितलंय. त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलंय. 

तर #MeTooचे वादळ मोदी सरकारपर्यंत पोहोचले आहे. आज केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिलाय. दरम्यान, त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. तसेच २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तनुश्रीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले. नानांनी मात्र या प्रकरणी फार काही बोलण्यात नकार देत तिने केलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.