पश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?

Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 8, 2023, 12:45 PM IST
पश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण  मुंबईकरांना किती फायदा होणार? title=
Western Railway Prepare Mumbai Local Six Line Up To Goregaon work complete

Mumbai Local Train NewsToday: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत जवळपास 2,500 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. 

सोमवारपासून पश्चिम रेल्वेवरील गाड्या पूर्वपदावर आल्या आहेत. तर, सहाव्या मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवासही जलद होणार आहे. याअतिरिक्त लाईनमुळं पश्चिम रेल्वेची क्षमता वाढून गर्दीचे विभाजन होणार आहे. या नवीन मार्गाची 112 किलोमीटर प्रतितास वेगाने यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईकरांचे जलद प्रवासाचे स्वप्न

पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातील खार ते गोरेगाव दरम्यान 8.8 किमीची मार्गिका उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी रेल्वेने सहा स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम पूर्ण केले त्याचबरोबर पाचव्या मार्गिकेवर आणि दोन्ही जलद मार्गिकेवर 12 टर्नआउट्स आणि तीन ट्रॅप पॉइंट नवीन सहाव्या मार्गिकेवर आठ टर्नआउट्स घालण्यात आले. शिवाय सध्याच्या नऊ टर्नआउट्समधून तीन ट्रॅप पॉईंट्स काढण्यात आले. 

मुंबई सेंट्रल ते बोरीवरीपर्यंत सहावी मार्गिका पूर्ण तयार झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवर 20 टक्क्यांपर्यंत लोकलची क्षमता वाढवण्यात येईल. लोकल ट्रेनच्या फेऱ्याही वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत सहाव्या मार्गिकेचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले असून दहा किलोमीटरच्या या मार्गिकेचे काम 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर, एकीकडे बोरीवली ते विरारपर्यंत पाचवी व सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल विकास निगम (MRVC) करत आहेत. त्याचबरोबर, गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत हार्बर लाइनचा विस्तारदेखील करण्यात येत आहे. 

सहाव्या मार्गिकेचे काम कुठपर्यंत 

पहिला टप्पाः  खार ते गोरेगावपर्यंतचा ९ किमी पर्यंतची मार्गिका तयार आहे. 

दुसरा टप्पाः गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत 11 किमीचा दुसरा टप्प्याचे नियोजन करण्यात आले असून 2025 पर्यंत ही मार्गिका तयार होईल

तिसरा टप्पाः मुंबई सेंट्रल ते खारपर्यंत काम तिसऱ्या टप्प्यात केले जाईल मात्र त्याची तारीख अजून ठरवण्यात आली नाहीये. 

सहाव्या मार्गिकेच्या या प्रकल्पासाठी एकूण 918 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.