तरुण शेतकऱ्याची पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

गळफास लावून जीवन प्रवास संपवला.

Updated: Oct 23, 2018, 04:06 PM IST
तरुण शेतकऱ्याची पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलीसह आत्महत्या title=

अकोले : अकोले तालुक्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आपली पत्नी सोनाली आणि दोन वर्षाच्या मुलगी शिवन्यासह आत्महत्या केली आहे. पांडुरंग शेळके असं शेतकऱ्याचं नाव आहे. काल संध्याकाळी पाचच्या सुमारास शेळकेंनी गळफास लावून जीवन प्रवास संपवला.

आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शेळके यांच्यातकडे एक हेक्टर शेती होती. दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करूनही तो आपली शेती व्यवस्थित सांभाळत होता.

तीन वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील सोनालीशी त्याचा विवाह झाला होता.त्यांना शिवन्या नावाची दोन वर्षे वयाची एक गोंडस मुलगीही होती. त्यांचा संसार आनंदाने सुरू असतानाच ही हृदयद्रावक घटना घडली आहे.