दुष्काळाचा आढावा घेण्यासाठीस केंद्राचं पथक मराठवाड्यात

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार 

Updated: Dec 2, 2018, 07:54 AM IST
दुष्काळाचा आढावा घेण्यासाठीस केंद्राचं पथक मराठवाड्यात  title=

औरंगाबाद : मराठावड्यातील भीषण दुष्काळीस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक येत्या पाच तारखेला मराठवाड्यात येणार आहे. याविषयीची माहिती विभागीय आयुक्तांनी दिलीय. पाच, सहा आणि सात असे तीन दिवस आठ जिल्ह्यांचा दौरा करून केंद्रीय पथक दुष्काळीस्थितीचा आढावा घेतला जाईल. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केला असला तरी मोठ्या मदतीसाठी केंद्राची मदत गरजेची असते, राज्यसरकारनं त्याबाबत केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे, त्याच प्रत्यावाच्या अनुषंगानं हे पथक मराठवाड्यात येणार आहे, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची पाहणी या पथकातील केंद्रीय अधिकारी असणार आहे.

मदतीचा मार्ग मोकळा 

 राज्याचे कृषी आयुक्त सुद्दा यावेळी केंद्राच्या पथकासोबत असतील, पिक पाण्याची पाहणी, खरीप आणि रब्बी पिकांचं झालेलं नुकसान या सगळ्याचा आढावा घेतला जाईल त्यानंतर केंद्रीय पथक मदतीबाबत अहवाल सादर करेल आणि केंद्राकडून राज्याच्या दुष्काळासाठी मदतीचा मार्ग मोकळा होईल.दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार असल्याचे मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आलंय.