सारा अली खान करणार कार्तिक आर्यन सोबत रोमान्स!

नवोदीत अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेट करू इच्छीते. मात्र, तिची ही इच्छा खऱ्या आयुष्यात कधी पूर्ण होणार हे माहीत नाही. मात्र तिची ही इच्छा पूर्ण होणार आहे, हे नक्की आहे. कारण तिला कार्तिकसोबत काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

Updated: Dec 7, 2018, 08:28 PM IST
सारा अली खान करणार कार्तिक आर्यन सोबत रोमान्स! title=

कोमल वावरकर | मुंबई : नवोदीत अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेट करू इच्छीते. मात्र, तिची ही इच्छा खऱ्या आयुष्यात कधी पूर्ण होणार हे माहीत नाही. मात्र तिची ही इच्छा पूर्ण होणार आहे, हे नक्की आहे. कारण तिला कार्तिकसोबत काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सारा आपला तिसरा सिनेमा करणार आहे. तिने हा सिनेमा साईनही केलाय. यात तिच्यासोबत कार्तिक असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तिची डेट करण्याची इच्छा पूर्ण होईल.

काही दिवसापूर्वी करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये साराने तिची ही इच्छा बोलून दाखविली होती. आता ही इच्छा तिची कधी पूर्ण होणार हे माहीत नाही, मात्र कार्तिक आर्यनसोबत तिला एक चित्रपट मिळालाय. सूत्राच्या माहीतीनुसार साराने तिसरा चित्रपट साइन केला आहे. या सिनेमात तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, साराने हा सिनेमा साईन केल्याचे वृत्त आहे.

एका न्यूज पोर्टलनुसार सारा अली खानला इम्तियाज अली या सिनेमा करण्यास आग्रह केलाय. ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सारा आर्यनसोबत काम करणार आहे. एका अर्थाने तिची इच्छा या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. लवकरच या सिनेमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जोडी पडद्यावर काय जादू करणार याचीही उत्सुकता शिगेला पोहोचले. तसेच सारा आणि आर्यनचे प्रेमप्रकरण सिनेमापुरते राहणार की ते पुढे जाणार याचीही चर्चा बॉलिवूडमध्ये जोरदार सुरु आहे.