ओखीनंतर सोशल मीडियावर 'विनोदाचं' चक्रीवादळ

ओखी चक्रीवादळाचा फटका मुंबईसह अनेक राज्यांना बसला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 09:28 PM IST
ओखीनंतर सोशल मीडियावर 'विनोदाचं' चक्रीवादळ  title=
Graphic Designer : Ranjeet Parab

मुंबई  : ओखी चक्रीवादळाचा फटका मुंबईसह अनेक राज्यांना बसला. 

हिवाळ्यात चक्क  अवकाळी मुसळधार पावसाने जोर धरल्यामुळे महाराष्ट्राला याचा मोठा त्रास होताना दिसला. समुद्र किनारी वसलेल्या गावांना याचा जास्त फटका बसला असून अनेक ठिकाणची शेतीचं नुकसान झालं आहे. राज्यातील शाळा, कॉलेजेसला शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी सुट्टी जाहीर केली होती. तसेच नागरिकांना कारण नसताना प्रवास करणं टाळा असं देखील सांगण्यात आलं होतं. पण हिवाळ्यात पावसाचा मोसम अनुभवायला लागल्यामुळे विनोदवीरांना देखील उधाण आलं होतं. 

हिवाळ्यातील या पावसाळ्यावर अनेक जोक्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल झाले. या विनोदांना देखील अधिक पसंती पाहायला मिळाली. यातीलच काही निवडक जोक्स