Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी

आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Updated: Mar 12, 2021, 12:53 PM IST
Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी   title=
संग्रहित छाया

मुंबई : आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधीनी 1993 रोजी 12 मार्चला हादरुन गेली होती. या दिवसाची आठवण येताच अंगावर काटा उभा राहतो. हा भुतकाळ विसरता येणार नाही, एवढी त्याची भीषणता होती.12 सीरियल बॉम्बस्फोटाने दहशतवाद्यांना घडवून आणले होते. या बॉम्बस्फोटात 250 हून अधिक लोकांनी आपले जीवन गमावले आणि 800 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. दरम्यान, एकिकडे स्फोट होत असताना दोघांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हजारो लोकांचे जीव वाचवले होते. 

मेजर वसंत जाधव यांनी जीवाची पर्वा केली नाही

75 वर्षीय सेवानिवृत्त मेजर वसंत जाधव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हजारो लोकांचे जीवन वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 12 मार्च 1993 रोजी प्रशासनाच्या विनंतीनंतर आपल्या जीवाची बाजी लावली. त्यांनी देशहिताचे काम केले. मुंबईत ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाले त्यावेळी ते मुंबई विमानतळावर कर्तव्यावर होते. प्रशासनाकडून मेजर जाधव यांना जबाबदारी देण्यात आली. प्रशासनाच्यावतीने, मुंबई बॉम्ब स्क्वाड टीमचे नेतृत्व करण्याची आणि विस्फोटक सामग्री ओळखण्याची जबाबदारी मेजर यांना मिळाली. मेजर जाधव यांनी अनेक ग्रेनेड शोधून काढले. जेणेकरून हजारो लोकांना प्राण वाचवले गेले.

मेजर जाधव यांची जबाबदारी येथे संपली नाही. या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी, 14 मार्च 1993 रोजी एक कॉल आला. फोनवर दादर स्टेशनच्या बाहेर एक बेवारस स्कूटी असल्याचे सांगितले जाते. या स्कूटरमध्य स्फोटक असल्याचे सांगितले गेल्यानंतर ते निकामी करण्याची जबाबदारी मेजर जाधव यांनी स्विकारले. शक्य तितक्या लवकर दादर स्टेशनवर ते पोहोचले. त्यावेळी मेजर जाधव यांना एक, दोन नाही तर तब्बल 12 किलो आरडीएक्स ठेवल्याचे सापडले. जर जाधव वेळीच तेथे पोहोचले नसते तर हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले असते.

तीन तासानंतर मेजर जाधव यांनी संपूर्ण 12 किलो आरडीएक्सला निकामी केले. मेजर जाधव यांच्या या शौर्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या टीममधील सर्व सदस्यांना सन्मानित करण्यात आले. मेजर जाधव यांना सर्व सदस्यांचा सन्मान केल्याने गर्व वाटत आहे. दुसरीकडे, त्यांना असेही वाटते की सरकारने त्यांना सन्मानित केले नाही, याची खंतही वाटत आहे.

28 वर्षे किर्ती अजमेरा दु:ख अनुभवतायत

28 वर्षापूर्वी या सीरियल बॉम्बस्फोटाचा अनेकांचे बळी गेले होते. या स्फोटात किर्ती अजमेरा हे जखमी झालेत. आजही ते दु:ख अनुभवत आहेत. आतापर्यंत त्याच्या उपचारांमध्ये 60 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु त्यांना अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारे मदत तसेच आधार मिळालेला नाही. अजमेरा हे मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या समोर उभे होते. ते जेथे उभे होते ते स्फोट झाला. बॉम्ब स्फोटानंतर त्यांच्य शरीरात अनेक बॉम्बचे अनेक तुकडे अडकले होते. गंभीर जखमी झालेल्या जमेरा यांनी सुमारे 60 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे.

हा माझ्यासाठी काळा दिवस आहे, असे अजमेरा यांनी 'झी न्यूज'ला सांगितले, 'माझा असा विश्वास आहे की सरकार मला भरपाई देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तो दुःखदायक आणि वेदनादायक अपघात होता. मार्च 1993 रोजी मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करीत होतो. जेथे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलो. मुंबई स्टॉक एक्सचेंज परिसरात प्रवेश करण्यापूर्वी स्फोट झाला होता. स्फोटानंतर मी बेशुद्ध पडलो. ते म्हणाले, जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा शरीराचे तुकडे पडले होते आणि रक्तच दिसून येत होते. तर रस्त्यावरील अनेकांच्या शरीराचे तुकडे दिसत होते. 

हा मोठा अपघात आठवताना ते म्हणाले, "मला एका टॅक्सीतून जीटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. परंतु ते मला भरती करू शकले नाहीत. कारण तेथे बेड खाली नव्हता. रुग्णालय दोन बॉम्बस्फोट झालेल्या मध्यभागी होते. स्फोटातील एका व्यक्तीच मृत्यू झाल्यानंतर मला एक बेड मिळाला. मी भाग्यवान होतो. मला ताबडतोब रुग्णालयात आणले गेले आणि मला तो खाली बेड मिळाला. अजमेरा यांनी सांगितले की गेल्या तीन दशकात मी त्या सर्व स्फोटक बळींसाठी सरकारकडून भरपाईची मागणी केली, परंतु माझ्या आवाहनानंतर सरकारी तापळीवर कोणताही प्रभाव पडला नाही. मला काही मदत मिळालेली नाही.

अजमेरा सांगतात, "मला आता पैशांची गरज नाही. परंतु मला माझी भरपाई रक्कम कशी मिळेल त्याची वाट वाहत आहे. प्रश्न हा नाही की, मी श्रीमंत किंवा गरीब आहे. हे सरकारसाठी शर्मिंदा आहे. देशात अनेक बळी आहेत जे माझ्यासारख्या अशा अपघातांचा बळी पडले आहेत आणि त्यांना उपचार मिळवू शकलेले नाहीत. मी भाग्यवान आहे की मला माझ्या कुटुंबास आणि मित्रांना पुरेशी पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्याकडून मिळेल्या प्रेमापोटी मी उपाचाराचा खर्च करत आहे.'