मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खळबळ! व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, घरातच आढळला मृतदेह

Mumbai New Today: मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 13, 2024, 11:56 AM IST
मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खळबळ! व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, घरातच आढळला मृतदेह title=
A 63-year-old woman namely Jyoti Shah was found murdered in the Nepean Sea Road area

Mumbai Crime News: दक्षिण मुंबईतील सर्वात हाय प्रोफाईल एरिया म्हणून समजल्या जाणाऱ्या नेपियन सी रोडवरील एका उच्चभ्रू वस्तीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नेपीयन सी रोडवरील एका इमारतीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव ज्योती शाह असून तिचे वय 63 इतके होते. (Mumbai News Today)

नेपीयन सी रोडवरील एका इमारतीत हे कुटुंब राहते. नेपीयन सी दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसर आहे. या परिसरात राजकारणी व मोठ्या व्यापाऱ्यांची घरे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला तिचा पती मुकेशसोबत राहत होती. मुकेश यांचा ज्वेलरी शोरुम आहे. ज्योती शाह यांची गळा घोटून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी भादंवि कलम 302 अंतर्गंत तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

पोलिसांचा नोकरावर संशय

पोलिसांना घरातील नोकरावर संशय आहे. काही दिवसांपूर्वीच या वृद्ध दाम्पत्याने एका व्यक्तीला घरातील सर्व काम करण्यासाठी नोकरीवर ठेवलं होतं. मात्र सध्या तो फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. व यासंबंधी इतर लोकांशीही चौकशी करण्यात येत आहे. 

ज्योती शाह आणि मुकेश शाह या दोघांचेही वय जास्त होते. त्यामुळं त्यांना घरातील काम झेपत नव्हती. याच साछी त्यांनी घरकाम करण्यासाठी नोकराला ठेवलं होतं. तो घरातील सगळी काम करायचा. तसंच, ज्योती यांनाही मदत करायचा. मात्र जेव्हापासून ज्योती यांची हत्या झाली तेव्हापासून तो बेपत्ता आहे. या हत्येत त्याचा काही हात आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांचा पहिला संशय नोकरावरच आहे. 

पोलिसांनी इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांची व इतर लोकांची चौकशी सुरू केली आहे, तसंच, सीसीटीव्ही फुटेजही पोलिस तपासून पाहत आहेत. याप्रकरणी संबंधित लोकांचीही चौकशी करत आहेत.