मुंबईतील खार परिसरातील नूतन विला इमारतीत आग, एका महिलेचा मृत्यू

मुंबईतील खार परिसरातील नूतन व्हिलाच्या इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे काम सुरूच आहे. घटनास्थळावरून तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे.

Updated: Sep 23, 2021, 11:49 PM IST
मुंबईतील खार परिसरातील नूतन विला इमारतीत आग, एका महिलेचा मृत्यू title=

मुंबई : मुंबईतील खार परिसरातील नूतन व्हिलाच्या इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे काम सुरूच आहे. घटनास्थळावरून तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

खार परिसरात ज्या इमारतीत आग लागली ती आठ मजली इमारत आहे. इमारतीच्या सातव्या मजल्याला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.