PHOTOS: लाडकी नात आजी नीता यांच्या कुशीत! हॉस्पिटलमधून घरी जाताना श्लोका-आकाशची लेक स्पॉट...

Shloka Mehta Daughter Spotted: श्लोका मेहतानं काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे अंबानींच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. श्लोका आणि आकाश अंबानींच्या घरी त्यांचे दुसरे अपत्य जन्माला आले आहे. यावेळी श्लोकाची लेक आजी नीता अंबानीच्या खुशीत बसलेली पाहायला मिळाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 5, 2023, 01:11 PM IST
PHOTOS: लाडकी नात आजी नीता यांच्या कुशीत! हॉस्पिटलमधून घरी जाताना श्लोका-आकाशची लेक स्पॉट...  title=
(Photo : InstaBollywood | Instagram)

Shloka Mehta Daughter Spotted: सध्या बॉलीवूडमध्ये कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्यांच्या आगमनाची चाहूल लागते आहे तर काहींच्या घरी लवकरच अवलीशी पावल ही बागडायला लागणार आहेत. त्यामुळे सध्या पाहिलंत तर सोशल मीडियावर गुडन्यूजचा पाऊस पडतो आहे. त्यात काही दिवसांपुर्वी अंबानी कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुणींचे आगमन झाले आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आणि सून आकाश व श्लोका अंबानी यांनी कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. यावेळी अंबानींच्या या नव्या लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. गाडीमधून जाताना अंबानी कुटुंब यावेळी स्पॉट झाले आहे. त्यांची लाडकी कन्या नीता अंबानींच्या कुशीत बसलेली पाहायला मिळाली. 

गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे श्लोका मेहता-अंबानीच्या बेबी शॉवरची. यावेळी तिची फॅशन स्टाईल आणि लुक पाहून चाहते घायाळ झाले होते. तिनं आपल्या बेबी शॉवरच्या निमित्तानं हटके लुक कॅरी केला होता. त्याचसोबत नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनावेळी श्लोकानं सुंदर राजस्थानाच्या राजेशाही घराण्यातील आणि आपल्या मेहता कुटुंबियांच्या घरच्या परंपरेतील सुंदर अशी पांढरी जरी असलेली 100 वर्षांपुर्वीची साडी परिधान केली होती. ज्याचे स्टाईलिंग खुद्द तिच्या सख्ख्या बहिणीनंच केले होते. 

श्लोका आणि आकाश यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. आता त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली आहे त्यामुळे त्यांचे चौकोनी कुटुंब पुर्ण झालं आहे. आकाश अंबानी ही रिलायन्स ग्रुपमध्ये टेलिकॉम आणि डिजिटल बिझनेस सांभाळतात. सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये आकाश आणि श्लोका अंबानी दिसत आहेत. त्यांच्यासोबत नीता आणि मुकेश अंबानीही होते. यावेळी आकाश ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला पाहायला मिळाला आणि श्लोका मागे बसली होती. त्याचसोबत तिच्यामागच्या बाजूला नीता अंबानी आणि मुकेश अंबानी बसेललेल पाहायला मिळाले. यावेळी आपल्या लाडक्या नातीला नीता अंबानींनी कुशीत घेतले होते. 

हेही वाचा >>>> दोघींपैंकी कोण लहान?; करिश्मा-करीनाला डिनरला एकत्र पाहून नेटकरी म्हणतात....

श्लोका आणि आकाश यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. आता त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली आहे त्यामुळे त्यांचे चौकोनी कुटुंब पुर्ण झालं आहे. आकाश अंबानी ही रिलायन्स ग्रुपमध्ये टेलिकॉम आणि डिजिटल बिझनेस सांभाळतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी श्लोकाला डिस्चार्ज मिळाल्याचे कळते आहे. त्यामुळे ते हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले. श्लोकाला मुलगी झाल्यावर संपुर्ण मेहता आणि अंबानी कुटुंबीय हे हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला गेले. धनराज नाथवानी यांनी ट्विट करून आकाश आणि श्लोकाच्या मुलीबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले होते की, ''आकाश आणि श्लोका यांच्या घरी लहानश्या राजकुमारीचे आगमन झाले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम येवो.'' धनराज नाथवानी हे ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांचे मित्र आहेत. सोबतच ते रिलायन्स इंडस्ट्रीचे ग्रुप प्रसिडेंट म्हणून कार्यरत आहेत.