दोघींपैंकी कोण लहान?; करिश्मा-करीनाला डिनरला एकत्र पाहून नेटकरी म्हणतात....

Karishma Kapoor and Kareena Kapoor Spotted: करीना आणि करिष्मा या बॉलिवूडमधील लोकप्रिय बहिणी आहेत, परंतु त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केल आहे. सोबतच त्यांची तुलनाही केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 3, 2023, 08:42 PM IST
दोघींपैंकी कोण लहान?; करिश्मा-करीनाला डिनरला एकत्र पाहून नेटकरी म्हणतात.... title=
(Photo : Viral Bhayani | Instagram)

Karishma Kapoor and Kareena Kapoor Spotted: अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर या बॉलिवूडच्या लोकप्रिय बहिणी आहेत. लोलो करिश्मा तर बेबो करीना म्हणून त्या दोघींची ओळख आहे. त्या दोघी अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी आणि इतर भव्य दिव्य सोहळ्यांना एकत्र उपस्थित राहतात. त्यांच्या चर्चाही अनेकदा होत असते. काही दिवसांपुर्वी करिश्मा कपूर आपल्या पहिल्या पतीसोबत एकत्र स्पॉट झाली होती. तेव्हा तिला ट्रोलही करण्यात आले होते. यावेळी या डिनरला करिश्माची मुलगी समायराही होती. करिश्माची मुलगी समायरा ही 18 वर्षांची झाली आहे. नुकताच तिचा वाढदिवस हा दणक्यात साजरा करण्यात आला होता. आता करीना, करिश्मा आणि परिवारासोबत एकत्र स्पॉट झाले. त्यामुळे यंदा त्यांचीच चर्चा रंगली होती. 

यावेळी करिश्मा कपूर, सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या भावंडांसह स्पॉट झाली. यावेळी कुणाल कपूरही त्यांच्यासोबत आला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीना, करिश्मा आणि सैफ हे तिनं आपल्या परिवारासोबत एका हॉटेलच्या बाहेर स्पॉट झाले यावेळी त्यांचीच चर्चा रंगली होती. यावेळी ते तिघंही आनंदी दिसत होते आणि एकमेकांसोबत विनोद करताना दिसत होते. करीनाही यावेळी आनंदात दिसत होती. काही दिवसांपुर्वी करीना ही एअरपोर्टवर स्पॉट झाली होती तेव्हा फॅनला सेल्फी न देता तिच्याकडे दुर्लेक्ष केल्यामुळे करीना ट्रोलही झाली होती. 

हेही वाचा - Mental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?

यावेळी करीना आणि करिश्मानं वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता. करीनानं व्हाईट कलरचा शर्ट तर करिश्मानं नेव्ही ब्लू कलरचा शर्ट परिधान केला होता. यावेळी त्या दोघी खूपच कॅज्यूअरल लुकमध्ये आल्या होत्या. त्या दोघींनाही केस बांधले होते आणि त्या नो मेकअप लुकमध्ये होत्या. करीनासोबत सैफ अली खानही स्पॉट झाला. त्यानं ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. यावेळी नेटकऱ्यांनी मात्र करीना आणि करिश्मावर निशाणा साधला. एका युझरनं त्या दोघींची तुलना केली ज्यात तो म्हणाला, करिश्मा मोठी असून ती करीनापेक्षाही लहान दिसते. तर एकानं कमेंट केली की, या दोघी एकत्र दिसल्या की कळतंच नाही करीना कोण आणि करिश्मा कोण.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर दुसऱ्या एकानं कमेंट केली आहे की, करीना तर कायमच निशेत दिसते. तर अशाच एका युझरनं कमेंट केली आहे की, सैफला सारखी सारखी करिश्मा का चिकटते, असं दाखवते की तीच सैफची बायको आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.