अमित शहांचा मुंबई दौरा, राणेच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विरोधी पक्षातील खास करून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काय भाष्य करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

Updated: Aug 27, 2017, 10:17 AM IST
अमित शहांचा मुंबई दौरा, राणेच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार? title=

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विरोधी पक्षातील खास करून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काय भाष्य करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

अमित शहा यांच्याकडून राणेच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने शुक्रवारी राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पश्चिम उपनगरातील घरी भेट देऊन राणेंच्या प्रवेशाबाबत राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे भाजपच्या गोटात बोलले जात आहे.