होणाऱ्या पत्नीविषयी अमित ठाकरे म्हणतो...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा झाला.

Updated: Dec 11, 2017, 04:32 PM IST
होणाऱ्या पत्नीविषयी अमित ठाकरे म्हणतो...  title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा झाला. यानंतर अमित ठाकरेनं मितालीबरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे. घरामधली नवीन बॉस, असं कॅप्शन अमित ठाकरेनं या फोटोला दिलं आहे.

५ वर्षांपासून अमित-मिताली एकत्र

राज ठाकरे आणि शर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अमित आणि मिताली यांचा साखरपुडा झाला. अमित-मिताली गेली पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमबंधात आहेत. महाविद्यालयीन शिक्षणावेळी या दोघांचे सूर जुळले होते. अमित वाणिज्य पदवीधर तसेच बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण तसेच व्यंगचित्रकार आणि मनसे राजकारणात सक्रिय आहे. तर मिताली फॅशन डिजायनिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अमित नुकताच एका दुर्धर आजाराशी लढून सुखरूप बाहेर आला.

राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता

महालक्ष्मी रेसकोर्सवर असलेल्या टोड्स हॉटेलमध्ये अमित-मितालीचा साखरपुडा झाला. हा अत्यंत खाजगी सोहळा असेल. अमित लवकरच मनसेच्या सक्रिय राजकारणात पूर्णपणे दिसण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाची सूत्र अमित यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.