बजाजने लॉन्च केली पल्सर 'एनएस१६०'

बजाजने आज पल्सर 'एनएस१६०' बाईक लॉन्च केली आहे. १६०सीसी इंजिनची क्षमता असलेल्या या बाईकची किंमत मुंबई मधल्या एक्स शोरूममध्ये ८०,६४८ रुपये इतकी आहे. प्रीमिअम क्वॅालिटी, इंटरनॅशनल स्टाईल आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत या बाईकला बजाज ऑटोने उत्तम बनवले आहे. 

Updated: Jun 30, 2017, 09:47 PM IST
 बजाजने लॉन्च केली पल्सर 'एनएस१६०'   title=

मुंबई : बजाजने आज पल्सर 'एनएस१६०' बाईक लॉन्च केली आहे. १६०सीसी इंजिनची क्षमता असलेल्या या बाईकची किंमत मुंबई मधल्या एक्स शोरूममध्ये ८०,६४८ रुपये इतकी आहे. प्रीमिअम क्वॅालिटी, इंटरनॅशनल स्टाईल आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत या बाईकला बजाज ऑटोने उत्तम बनवले आहे. 

बजाज ऑटोचे प्रेसि‍डेंट एरिक वास यांनी सांगितले की, या बाईकमध्ये अॅग्रेसिव्ह स्टायलिंग आणि हाय परफॉर्मन्सचे मिश्रण आहे. या बाईकला पल्सर 'एएस१५०'च्या प्लॅटफॉर्मवर बनवलं गेलं आहे. तसेच ही बाईक पल्सर 'एनएस२००'च्या मॉडेलची कॉपी केली आहे. 

रायडिंग रूटीनमध्ये हाय परफॉर्मन्स आणि स्टाईलला पाहताना या बाईकची डिझाईन केली आहे. एरिक वास यांच्या मते, आज ७०% स्पोर्ट्स बाईकींग सेजमेंटमध्ये १५० ते १६०सीसी इंजिन पावर असलेल्या मोटरसायकल्स आहेत. तसेच ग्राहकांच्या पल्सर एनएस सीरीजच्या वाढत्या मागणीनुसार या बाईकची निर्मीती करण्यात आली आहे.